बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिया मिर्झानं पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो!

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. दियाचं नुकतंच दुसरं लग्न झालं असून दियानं तिला बाळ झाल्यापासून पहिल्यांदाच त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दियानं ‘जागतिक हत्ती दिवसा’च्या निमित्तानं खास पोस्ट केलीय. यात अव्याननं हत्तीच्या प्रिंटचे कपडे परिधान केले आहेत. हा फोटो शेअर करत ‘आम्ही सगळे आज जागतिक हत्ती दिवस साजरा करत आहोत,’ अशा आशयाचं कॅप्शन दियानं दिलं आहे. दियाच्या या पोस्टनं अनेकांच्या चेहऱ्यावर हास्याची लाट आणली आहे. तिचे चाहते छोट्याशा अव्यानची थोडीशी झलक पाहूनही आनंदी झाले आहेत.

अव्यान हा प्रीमॅच्युअर बेबी असल्यानं त्याची अधिक काळजी घ्यावी लागते, असं दियानं सांगितलं होतं. आता दिया बाळासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.

दरम्यान, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियानं बेबी बम्पसह फोटो शेअर करत थेट मालदीव्सहून गुड न्यूज दिली होती. दियानं सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिला बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

थोडक्यात बातम्या –

चिंताजनक! कोरोना लस घेऊनही डेल्टा प्लस व्हेरिएंटची होतेय लागण

कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा, मी स्वत: घेतला- सायरस पुनावाला

“पंकजा मुंडेंवर आरोप करून शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम सत्ताधारी करतायेत”

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट

कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More