Diabetes Diet | सुका मेवा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बदाम, काजू, अक्रोड याचबरोबर ड्राय फ्रूटसचे असे अनेक प्रकार आहेत, ज्याचा समावेश एका हेल्दी डाएटमध्ये होतो. मात्र, ज्यांना मधुमेह आहे, अशा रुग्णांनी काही ड्राय फ्रुट्सपासून दूर राहणेच फायद्याचे आहे. कारण, बऱ्याच ड्राय फ्रूट्समध्ये नैसर्गिक (Diabetes Diet ) साखर काँसंट्रेटेड फॉर्ममध्ये असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
याचबरोबर ड्राय फ्रूट्समध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाणही अधिक असते. म्हणून मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी शक्यतो ड्राय फ्रूटस खाणे टाळायला हवे. आता यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे ड्राय फ्रूटस खाऊ नये, ते जाणून घेऊयात.
Diabetes असणाऱ्यांनी कोणते ड्राय फ्रूट्स खाऊ नये?
मनुका : मनुकामध्ये खूप सारे पोषक घटक असतात. मात्र, मधुमेहाचा विचार केल्यास यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी मनुका न खाणेच चांगले आहे.
खजूर : मधुमेहाच्या रुग्णांना नैसर्गिक गोडवा देण्यासाठी खजूरचा वापर केला जातो. पण काही तज्ज्ञांच्या मते यात साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची (Diabetes Diet ) पातळी अचानक वाढते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी खजूरपासून दूर राहावे.
अंजीर : अंजीरमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा ते कोरडे होते तेव्हा त्याचे काँसंट्रेटेड फॉर्म रक्तातील साखर वाढवू शकते. त्यामुळे अंजीर जास्त खाऊ नये.
क्रॅनबेरी : ड्राय क्रॅनबेरी महिलांसाठी खूप (Diabetes Diet ) फायदेशीर आहेत आणि लघवीशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जाण्यास मदत करतात. पण, याचे सेवन जास्त केल्यास शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.
जर्दाळू आणि प्लम : ही दोन्ही फळे (Diabetes Diet ) ड्राय फ्रूट्स म्हणून खूप खाल्ली जातात.परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी हे ड्राय फ्रूट्स चुकूनही खाऊ नये, असं काही आरोग्य विशेषक म्हणतात.
News Title : Diabetes Diet
महत्वाच्या बातम्या-
“माझ्या नादाला लागू नको, फडणवीसांचं राजकीय करीअर..”; जरांगेंनी भाजप नेत्याला झापलं
‘या’ धक्कादायक कारणामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान देश सोडून पळाल्या; दिला राजीनामा
दुचाकी बाईक चालवण्याआधी ही बातमी वाचा; या लोकांवर होणार थेट कारवाई
गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल
भाजपचं टेन्शन वाढलं; विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर, पाहा कोण आहेत?