Diabetes Tips | आजकाल मधूमेहाच्या रुग्णांची संख्या अधिक वाढताना दिसत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातही अनेक बदल झाले आहेत. याचा परिणाम म्हणजे कमी वयातच अनेक आजार होतात. त्यातच अती वजन असेल तर मधुमेह (Diabetes Tips) होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या जखमा लवकर भरत नाहीत, त्यामुळे त्यांना सतत काळजी घ्यावी लागते.
आता मधुमेह रुग्णांनी फक्त गोड पदार्थ खाणे टाळणे एवढेच नसते. तर, बऱ्याच जणांना लो शुगरचाही त्रास असतो. त्यात आपण रोज आहारात खातो ती भाकरीही आरोग्यावर परिणाम करत असते. मधुमेहामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे निवडणे खूप कठीण असते. अशा परिस्थितीत योग्य पीठ निवडण्यात रुग्णांना सर्वात जास्त अडचणी येतात.
मधुमेहाच्या रुग्णांना अशी भाकरी खावी लागते ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मग आता यासाठी कोणते पीठ चांगले, हा प्रश्न पडतो. मधुमेहाच्या रुग्णांना आहारामध्ये प्रोटीन्स आणि फायबरशिवाय इतर अनेक पोषक घटकांचा समावेश करण्याचा सल्ला कायम देण्यात येतो. आता अशा रुग्णांनी कोणत्या भाकरीचे पीठ खावे, याची तुम्हाला इथे माहिती दिली आहे.
‘या’ पिठाच्या भाकरी खाणे फायदेशीर
नाचणीचे पीठ : मधूमेहाच्या रुग्णांसाठीनाचणीचे (Diabetes Tips) पीठ अत्यंत लाभदायक असते. नाचणीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने कॅल्शियम, प्रोटीन, ट्रिप्टोफॅन, आयर्न, मेथिओनिन, फायबर, लेसीथिन इत्यादींचा शरीराला पुरवठा होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
राजगिऱ्याचे पीठ : राजगिरा आणि राजगिऱ्याचे तेल सप्लिमेंट अँटीऑक्सिडंट थेरपी म्हणून कार्य करू शकते, असे एका संशोधनामध्ये म्हटले आहे. यामुळे हाय ब्लड शुगरचा धोका टळण्यास मदत होते. त्यामुळे राजगिऱ्याचे पीठ तुम्ही खाऊ शकता.
बेसनाचे पीठ : बेसन पीठ पासून अनेक पदार्थ बनवता येतात. अगदी गोड पदार्थपासून ते चटपटीत भजेही बनवता येतात. बेसनामध्ये प्रोटिन्स जास्त असतात, त्यामुळे ते कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे असते. यामुळेच वजन कमी करण्यासोबतच डायबिटीजमध्येही ते उपयुक्त ठरते.
बाजरीचे पीठ : बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
ज्वारीचे पीठ : ज्वारीमध्ये भरपूर फायबर (Diabetes Tips) असते. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे एक भरड धान्य आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांनी ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीचे सेवन करायला हवे.
News Title – Diabetes Tips
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव
मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…
उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल
मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं
‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण