बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणी मातीत सापडत आहेत हिरे; हिरे शोधायला हजारो लोकांची गर्दी

नवी दिल्ली | अनेक वेळा जमीन खोदल्यानंतर हिरे सापडत असल्याचे अनेक किस्से आपण ऐकतो. याबाबतचे अनेक सीन्स देखील चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. अशातच एका ठिकाणी मातीत हिरे सापडत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर संबंधित ठिकाणी हजारो लोकांनी गर्दी करत खोदून हिरे शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

क्वाजुलु-नताल प्रांतातील क्वाह्लथी गावात हिरे सापडत असल्याची बाब समोर आली. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी येथे गर्दी करुन जमीन खोदायला सुरुवात केली. या ठिकाणी काही रहस्यमयी दगड सापडत असल्याचं  येथील लोकांनी म्हटलं आहे. हे रहस्यमयी खडक नक्की हिरेच आहेत का नाही याची खात्री अद्याप झालेली नाही.

सापडत असलेले खडक हिरे आहेत की, नाही याची माहिती नसून देखील अनेक लोक या खडकांसाठी मोठी किंमत मोजत आहेत. 100 ते 300 आफ्रिकन रँड म्हणजे 7.29 ते 25 डॉलर असा दर दगडाला मिळतो आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खनिज संशोधन विभागाने हे हिरे असल्यासंदर्भात अद्याप पुष्टी दिलेली नाही.

दरम्यान, भूगर्भशास्त्रज्ञ आणि उत्खनन तज्ज्ञांचं एक पथक येथे पाठवलं जाणार आहे. तसेच नमुने गोळा करून अभ्यास केला देखील केला जाणार असल्याचं सरकार सांगत आहे. हिरे मिळतील आणि नशीब बदलेल, या आशेने रात्रंदिवस लोक येथे येऊन खोदत आहेत.

थोडक्यात बातम्या-  

35 हजार लसी पडुन असल्याने ‘या’ महापालिकेचा लसीकरण सर्वांना सक्तीचं करण्याचा विचार

“काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू”

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क – पुणे प्रशासन

‘या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे’; प्रदीप शर्मांना अटक झाल्यावर भाजपची टीका

सरकारच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास मासिक पेन्शनची हमी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More