‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे
मुंंबई | पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना(Sanjay Raut) ईडीने(ED) अटक केलीये. त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) करण्यात आली होती. गुरूवारी राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. चौकशीदरम्यान काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याने ईडीने राऊतांची ईडी कोठडी वाढवण्याची मागणी न्यायलयात केली असता, न्यायालयाने राऊतांची आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवली आहे.
मनी लाॅड्रिंग प्रकरणी ईडीने संजय राऊतांच्या घराची झडती घेतली असता, ईडीच्या हाती एक डायरी लागली आहे. या डायरीत राऊतांबाबत पुरावे आहेत. असा ईडीचा दावा आहे. ही डायरी राऊतांच्या खोलीतून ईडीच्या हाती लागली आहे. या डायरीत एक को़टी सतरा लाख रूपये ज्यांना दिले आहेत, त्यांची नावे कोडवर्डमध्ये दिल्याचा ईडीचा दावा आहे.
मात्र संजय राऊतांनी याबाबत काही सांगितले नाही. या डायरीत कोर्डवर्डमध्ये काही महत्वाची माहिती आहे. त्यामध्ये कोणाला समजू नये, म्हणून व्यवहारातील सर्वांची नावे स्पष्ट न लिहिता कोड भाषेत लिहिली आहेत, म्हणूनच राऊतांची कोठडी संपल्यानंतरही ईडीने डायरीचा संदर्भ देत राऊतांची कोठडी वाढवून घेतली आहे.
दरम्यान, रविवारी संजय राऊतांच्या घरची ईडीने झडती घेतली असता, 11 लाख 50 हजार रूपयांची रक्कम तसेच काही महत्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रानुसार ईडी पुढील चौकशी करत आहे.
थोडक्यात बातम्या-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर
“ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग मिळाला तर आमच्या शुभेच्छा”
“प्लॅस्टिक सर्जरी ही फार महागडी गोष्ट, लग्नापूर्वी मी एकदाही ब्यूटी पार्लरला गेले नव्हते”
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर
Comments are closed.