बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंडे भगिनी नाराज?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

नाशिक | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना काल मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे.  मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

राजकीय वर्तुळात चालू असणाऱ्या या चर्चांबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंडे भगिनी नाराज असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना देवेंंद्र फडणवीस चांगलेच भडकलेले दिसले. आज ते नाशिकमध्ये माध्यमांंशी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. उगीच कारण नसताना मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात.

दरम्यान, राष्ट्रपती भवनात कालचा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वात आधी नारायण राणे यांंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी हिंदीत आणि ईश्वर साक्षीने शपथ घेतली.

थोडक्यात बातम्या 

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

पुण्यातील शाळा सुरू करण्यास मिळाला हिरवा कंदील; दीड वर्षानंतर होणार शाळा सुरू!

रूपाली चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

“देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे”

धक्कादायक! चोरीच्या भितीने लेकरांच्या पायात साखळी बांधून लावलं कुलूप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More