मुंबई | राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरू असताना राजकीय पक्षांची विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या नावांमुळे कहीं खुशी कही गम अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. आतापर्यंत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपकडून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. त्यातच आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे.
विनायक मेटे यांनी यावेळी बोलताना मित्रपक्षाची गरज भाजपला आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे. मित्र पक्षाला सोबत घेऊन त्याला मध्ये सोडून द्यायचं आणि उपयोग झाला की टाकून द्यायचं अशी नीति ठरलेली तर नाही ना?, असाही सवाल विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच भाजपने फक्त आम्हाला वापरून घेतले का?, असा खोचक सवालही विनायक मेटे यांनी केला आहे.
भाजपसोबत आम्ही 2014 पासून मित्रपक्ष म्हणून काम करत आहोत. विधानपरिषदेची नावे जाहीर झाल्यानंतर अन्याय झाल्याची भावना सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. सत्ता असताना मित्र पक्षांना मंत्रिपदे दिली होती. मात्र, शिवसंग्रामला मंत्रिपद दिले गेले नाही. 2019 च्या तिकीटवाटपामध्ये देखील अन्याय झाला. विधानपरिषदेसाठी विरोधी पक्षनेते आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी शब्द दिला होता, अशी खंत विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, विनायक मेटे आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न केला. भाजपकडून मित्रपक्ष असलेले रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही.
थोडक्यात बातम्या-
‘नापास झालो तर बिल्डींगवरून उडी मारेन’ मित्रांना चेष्टेत बोलला पण निकाल पाहताच उचललं टोकाचं पाऊल
मोठी बातमी! मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट; विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.22 टक्के
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर, आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?
Comments are closed.