बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेगासस प्रकरणाची ऑर्डर पंतप्रधान मोदींनी किंवा गृहमंत्र्यांनी दिली”

नवी दिल्ली | इस्त्रायलच्या पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील 40 पेक्षा जास्त पत्रकार, विरोधी पक्षातील नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यमसमूहांनी केला होता. त्यातच आता पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या प्रकरणी काँग्रेसने जी भूमिका घेतली होती त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. पेगासस प्रकरणामध्ये मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली असून त्यातील सत्य लवकरच जनतेच्या समोर येईल, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

पेगासस प्रकरणाची ऑर्डर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे किंवा गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. कारण त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतीही व्यक्ती या अशी ऑर्डर देऊ शकत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पेगासस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतंत्र्य समितीच्या मार्फत करावी अशी मागणी देशातील विविध विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती निर्धारित केली आहे. त्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या –

दिवाळी सुट्ट्या जाहीर! राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या

मोदी सरकारचा मोठा निर्णय! समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा

रणबीर-आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार? शुटिंग थांबवल्याने चर्चांना उधाण

“इतिहास काढला तर लक्षात येईल, हमाम में सब नंगे है”

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More