‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात
मुंबई | मंत्र्यांच्या फोन टॅपींग प्रकरणामुळे राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला चर्चेत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांबाबत धक्कादाक दावे केले आहेत. शुक्ला यांनी शिरोळचे अपक्ष आमदार आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महाविकासआघाडीमध्ये न जाता भाजपला पाठींबा देण्यासाठी सांगितलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं होतं.
रश्मी शुक्ला यांनी यड्रावकरांची वैयक्तिक भेट घेत त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजे, असा सवाल आव्हाड यांनी केला. यावर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला रश्मी शुक्ला यांनी भाजपमध्ये जाण्याबाबत विचारण्यात आलं हे ही गोष्ट खरी आहे. मात्र मी त्याचवेळी त्यांना सांगितलं होतं की ज्या मतदारसंघाने मला निवडून दिलं आहे त्यांचा विचार घेतल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. त्यानंतर माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा मेळावा घेतला. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील जनतेने सांगितलं की, महाविकासआघाडी सरकारसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपण जायचं आहे, असं राजेंद्र यड्रावकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्याशी थेट बोलणं झाले नव्हतं त्यांच्याच एका माणसाने फोनवर संभाषण करुन दिलं असल्याचं यड्रावकरांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस
पूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश
‘…म्हणून आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून जाड झाल्या’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर; ‘या’ जिल्ह्यातही आजपासुन कडक लाॅकडाऊनचे आदेश!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.