बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

मुंबई | पावसामुळे कोकण भागात खूप नुकसान झालं. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या भागात गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केलं. त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका करायलाही सुरूवात केली आहे.

भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. या संदर्भात अतुल भातखळकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

आपत्तीमुळे पिचलेल्या जनतेवर बघा कसे हातवारे करतोय, असं म्हणत भास्कर जाधव यांच्यावर भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच कसला माज आलाय यांना, जनतेचे अश्रुही दिसत नाहीत. इथेही सत्तेची मस्ती बाजूला ठेवता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी केलेल्या कृत्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही टीका केली आहे. महिलेवर उगारलेला हाच हात पाच वर्षावरनंतर जोडून मत मागायला याल. तेव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

पूरग्रस्तांसाठी विजय वडेट्टीवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More