Top News महाराष्ट्र मुंबई

“गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमीपूजनासाठी ठाकरे आणि पवारांची परवानगी घेतली का?”

मुंबई | आज गृहमंत्री अनिल देशमुख एका मंदिराचे भूमीपूजन करणार आहेत. यावरुन भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत गृहमंत्री आणि महाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

तुषार भोसले यांनी त्यात लिहले की, “गृहमंत्री अनिल देशमुख आज एका मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. ही बाब आभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली का?”, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

काहींना वाटतं की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल आणि ई-भूमिपूजन करावे अशी या आपल्या नेत्यांची अनुक्रमे मते आहेत, असही तुषार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

दरम्यान, तुषार भोसले यांच्या ट्विटवरुन राजकारण चांगलच रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांना धडा शिकवा, त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा”

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

उद्यापासून अकारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार!

काँग्रेस आमदाराला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आरोप

“मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या