बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कपिल देवची इंग्रजी ऐकली का? 83चा व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारतात क्रिकेटची (Cricket) एक वेगळीच क्रेझ आहे. भारतीयांनी सुरूवातीपासून क्रिकेटला भरपूर प्रेम दिलं. भारताने 1983 साली पहिला विश्वचषक (World Cup) आपल्या नावावर केला होता. कोणालाही वाटलं नसेल असं काम भारतीय संघाने भारतीय संघाने केलं होतं. त्या विश्वचषकावर आधारित आता ’83’ हा चित्रपट येणार आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.  (83 movies video viral on social media)

या चित्रपटात रणवीर सिंग भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील एक मजेशीर व्हिडीओ रणवीरने आपल्या इंनस्टाग्राम अकाऊंंटवरून शेअर केला आहे.यात भारताचे माजी गोलंदाज बलविंदर संधू आहेत. एका कार्यक्रमात बलविंदर संधू कपिल देव यांच्या इंग्रजीचा मजेशीर किस्सा सांगत आहे.

कपिल देव नेहमीप्रमाणे इंग्लंडमध्ये असल्यामुळे मैदानात देखील इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत होता. एका सामन्यात मी गोलंदाजी करत असताना कपिल माझ्याकडे आला आणि सरदार खूप वाईट गोलंदाजी करतोय. चौकार जाऊ देयचा नाही. आपण There, there and there फिल्डर लावू, असं म्हणून कपिल निघून गेला, असं बलविंदर संधू सांगतात.

दरम्यान, बलविंदर संधू यांना न समजल्याने त्यांनी Where, Where and Where असा सवाल केला. मात्र, कपिल देव यांनी बलविंदर संधू यांनाच मैदानात खडसावलं. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता आलं नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)


थोडक्यात बातम्या-

Second Dose घेतलाय का? नसेल तर भरावा लागणार 500 रूपये दंड

मराठवाड्याचं टेंशन वाढलं! ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात”

श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 14 जवान जखमी तर 5 गंभीर

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More