बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”फाटली म्हणून भाजपमध्ये गेले का?, गेले ते गेले…”

पुणे | राज्यात मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मी भाजपमध्ये आल्यावर मला आता शांत झोप लागते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी चांगलीच टीकेची झोड उडवली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

मला भाजपमध्ये गेलो म्हणून शांत झोप लागते,असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? गेले ते गेले पण आमच्यावर केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असला तरी महाविकास आघाडी सरकारला काहीच फरक पडत नाही. पण आम्हाला शांत झोप येते आणि येणारच. तुमची झोप आम्ही लवकरच उडवून टाकू, अशी मलिक यांनी पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

शरद पवार यांनी माझ्याकडं जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं हे माझ्याकडं दिलं आहे. माझ्या हाती एक्साईज खातं दिलं जाणार होतं, पण मी नकार दिला. तसेच आमच्या धर्मामध्ये मद्यपानाला थारा नाही, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे पुण्यातील मावळमध्ये अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते. त्यांनी या कार्यक्रमात केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या –

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

अखेर सुयश आणि आयुषी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो

“उभा महाराष्ट्र मला ओळखतो, मी आयुष्यात कधीच बेईमानी केली नाही”

पहिल्यांदा टीका, आता अभिनंदन! चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकरांना खास शुभेच्छा

‘रूपाली चाकणकरांनी महिलांसाठी केलं तरी काय?’; शालिनी ठाकरेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More