बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीदी तुम्हाला राग आला तर मला शिव्या घाला- नरेंद्र मोदी

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालमध्ये ममता बॅनर्जीविरोधात शड्डू ठोकले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 17 एप्रिलला होणार आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपतर्फे ममता बॅनर्जीवर तसेच ममता बॅनर्जीकडून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धमान येथे आयोजित एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी या केंद्रीय यंत्रणांविरुद्ध कार्यकर्त्यांना भडकावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘दीदी तुम्हाला जो राग काढायचा तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली.

वर्धमान येथे आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या चार टप्प्यात तृणमुल काँग्रेसचा पराभव झाल्याचं भाकीत करून ममता बॅनर्जी यांचा पराभव एकदा झाला की, त्या परत कधीच निवडून येणार नाही, असं वक्तव्य केलं आहे

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ते परत निवडून आले नाही. त्यानंतर वामपंथी, डाव्यांचा पराभव झाल्यानंतर ते ही पुन्हा निवडून आले नाहीत. त्यामुळे ममता दीदी तुम्ही एकदा निवडणूक हारून गेलात कि परत येणार नाहीत, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

मराठमोळी संगीतकार जोडी अडचणीत, ‘या’ कारणामुळे पोलिसात तक्रार दाखल

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर जोरदार पावसाचं सावट, हवामान खात्याचा इशारा

रुग्णसंख्या हजारात पण शिल्लक बेड बोटावर मोजण्याएवढेच; ‘या’ शहरातील विदारक परिस्थिती

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली, वाचा सविस्तर

परीक्षा आताच घ्या अन्यथा… ; दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More