महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

Diesel-Petrol Prices l येत्या काळात डिझेल आणि पेट्रोलमुळे जनतेला महागाईचा नवा धक्का बसण्याची शक्यता वाटण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे लवकरच देशातील डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण जागतिक बाजारात कच्च्या तेलाने बुधवारी जवळपास दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनतेला महागाईचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

3 आठवड्यात 10 टक्के वाढ :

काल (19 जून) ला ऑगस्ट डिलिव्हरीसाठी ब्रेंट क्रूडची किंमत 20 सेंटने वाढून प्रति बॅरल $ 85.53 वर पोहोचली, तर सप्टेंबरच्या सौद्यांची किंमत 21 सेंटने वाढून $ 84.74 वर पोहोचली आहे. दरम्यान, अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 3 सेंटने वाढून 81.60 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. जवळपास दोन महिन्यांतील कच्च्या तेलाची ही सर्वात महाग पातळी आहे.

गेल्या दीड महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. जूनच्या सुरुवातीला नीचांकी पातळी गाठल्यानंतर, कच्च्या तेलाचा दर आतापर्यंत प्रति बॅरल $8 पेक्षा जास्त झाला आहे. याचा अर्थ गेल्या तीन आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

Diesel-Petrol Prices l या कारणांमुळे कच्चे तेल महाग होतेय :

मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत $1 पेक्षा जास्त वाढ झाली आहे. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील एका प्रमुख बंदरातील तेल टर्मिनलला आग लागली. या व्यतिरिक्त, उन्हाळ्याच्या तीव्र मागणीच्या बातम्या आणि जगाच्या विविध भागांमध्ये वाढता भू-राजकीय तणाव देखील कच्च्या तेलाला उच्च पातळीवर ढकलत आहेत. रशिया-युक्रेन व्यतिरिक्त पश्चिम आशियात इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात व्यापक युद्ध होण्याची भीती वाढली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत भारतातील लोकांना मोठा धक्का बसू शकतो. निवडणुकीपूर्वी प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर डिझेल आणि पेट्रोलचे दर थोडे कमी करण्यात आले. तेव्हापासून देशातील जवळपास सर्वच भागात डिझेल आणि पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र, किमती बदलण्याचा दबाव वाढत आहे. अलीकडेच, कर्नाटक सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाग कच्चे तेल सरकारी तेल कंपन्यांना देशभरातील डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढवण्यास भाग पाडू शकते.

News Title – Diesel-Petrol Prices Hike

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यासह या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; यलो अलर्ट जारी

मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय!

या राशीच्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागणार

कोणी 22 वर्षांचा तरूण तर कोणी घरचा कर्ता, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर 4 समर्थकांनी आयुष्य संपवलं

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा