हिवाळ्यात घ्या फक्त ‘या’ गोष्टींची काळजी, चुकूनही वाढणार नाही वजन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | हिवाळा ऋतू (Winter) आला की साधारण 2-4 किलो वजन (Weight) वाढतं आणि मग वाढलेलं वजन कमी कसं करायचं किंवा वजन वाढू नये यासाठी काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण हिवाळ्यात काही अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं वजन नियंत्रणात राहायला मदत होते. (weight loss tips)

हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे आणि चमचमीत पदार्थ खायला मिळतात. त्यामुळे आपला जीभेवर ताबा राहात नाही आणि परिणामी वजन वाढते. त्यामुळे थंडीच्या महिन्यात आहार व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे.

हिवाळ्यात वजन वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली दिनचर्या. थंडीमुळे माणूस सुस्तावतो, व्यवस्थित व्यायाम होत नाही आणि दिनचर्या बिघडल्यामुळे मग वजनही वाढतं. त्यामुळे थंडीत योग्य आहार (Diet) आणि नियमित व्यायाम (Exercise) ठेवला तर चुकूनही तुमचं वजन वाढणार नाही.

थंडी म्हणलं की आपण पाणी कमी पितो. मात्र, शरिराला पुरेसं पाणी मिळालं नाही तरी त्याचे शरिरावर परिणाम होतात. त्यामुळे तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पिलं तर तुमचं वजनही नियंत्रणात राहिल.

हिवाळ्यात आपण डिंकाचे लाडू, चिक्की, काजू यासारखे पदार्थ खातो. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज (Calories) असल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे या पदार्थांसोबतच आहारात हिरव्या पालेभाज्या आणि पेरू, संत्री, बीट यासारख्या फळांचा पण समावेश करू शकता.

दरम्यान, हिवाळ्यात सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. बाहेर जाणं शक्य नसेल तर घरीच जमेल तसा व्यायाम करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूकेपेक्षा दोन घास कमीच जेवा. या काही गोष्टींची काळजी घेतली तर या थंडीत तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहिल.

सगळ्यात शेवटी एक महत्त्वाची टीप, वरील माहिती सामान्यज्ञानावर आधारीत असून आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

महत्त्वाच्या बातम्या-