बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ऊसाची एफआरपी टप्प्यात दिली पाहिजे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील ऊसाची एफआरपी 3 टप्प्यात (60+20+20) देण्यात यावी, अशी केंद्राकडे शिफारस केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता एकरकमी एफआरपीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून डिजिटल आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्रात जर भाजपचे सरकार आहे तर महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा विरोध केला पाहिजे आणि एकरकमी द्यावी असा आग्रह केला पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढेल. कदाचित हा निर्णय मविआच्या आमदारांना मान्य नसेल, असं ऊस तज्ज्ञ डॉ अंकुश जालिंदर चोरमुले यांनी म्हटलं आहे.

एफआरपीला विरोध करण्यासाठी आम्ही शेतकरी समूहामार्फत डिजिटल आंदोलन छेडत असल्याचं चोरमुले यांनी सांगितलं आहे. शनिवारी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या वेळेला ‘#एकरकमी_frp’ हा हॅशटॅग करून आपल्याला फेसबुक, ट्विटर, इंस्टाला पोस्ट करायचं आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे. प्रत्येकाने या डिजिटल मोहिमेत सहभागी व्हावं व आपली एकी दाखवावी, असं आवाहन देखील शेतकरी समूहामार्फत करण्यात येत आहे.

दरम्यान, जर पहिला हफ्ता 60 % मिळाला तर 1600 ते 1700 च्या आसपास पहिला हफ्ता मिळेल जो सोसायटी आणि कर्ज भागवण्यात जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील ही परिस्थिती आहे तर मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती वाईट आहे. आज सगळ्या पिकांचा विचार केला तर ऊस हा आपण उधारीवर कारखान्याला देतोय. कधी पैसे मिळतील, किती मिळतील याची खात्री नाही. बाकीच्या पिकात काहीतरी भाव मिळतो पण ऊस हा उधारच द्यावा लागतोय. या बाबतीत आताच जागे व्हा नाहीतर आयुष्यभर गुलाम होण्याची तयारी ठेवा, असंही डॉ अंकुश जालिंदर चोरमुले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

शेतकऱ्यांना आता 6000 ऐवजी मिळवता येणार पूर्ण 36 हजार रुपये, वाचा सविस्तर

“महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल”

…म्हणून नरेंद्र मोदी ‘कोव्हॅक्सिन’ घेऊनही अमेरिकेत गेले, वाचा कारण!

[email protected],000! शेअर बाजाराची ऐतिहासिक वाटचाल; निफ्टीची विक्रमी उसळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More