बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल”

सोलापूर | काल करमाळा येथे ऊस बिलांबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या करमाळ्याचे पदाधिकारी मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व इतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऊसबिले न देता कारखाना सुरू असल्याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या पदाधिकाऱ्यांना स्वतः व गुंडांकरवी जी मारहाण केली आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.. विशेष म्हणजे हे चेअरमन शिवसेनेचे नेते आहे.

मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले मुजोर कार्यकर्ते वेळीच आवरा. सत्तेची ही मस्ती नक्कीच उतरवली जाईल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटना युवाआघाडी आणि राज्यप्रवक्ता रणजित बागल यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यभरातील स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांसह आम्ही दिग्विजय बागलला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही.. हा माज नक्कीच उतरवला जाईल.. स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी विजय रणदिवे करमाळ्याचे पदाधिकारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.. दिग्विजय बागलांना नक्कीच शेतकरी व सभासद धडा शिकवतील, असंही रणजित बागल यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

‘…हे लावालावी करायचं काम संजय राऊत करतात’; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघाती हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक! केली होती ‘ही’ मोठी घोषणा

मोठी बातमी! आज होणारी म्हाडाची परिक्षा रद्द, आता ‘या’ महिन्यात होणार परिक्षा

“राहुल गांधींची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम 144 लावला जातो”

कोरोना लस घेण्यासाठी दिवसातील योग्य वेळ कोणती?; तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More