माझ्या भाषणामुळे काँग्रेसची मतं कमी होतात; दिग्विजय सिंग यांची खंत

नवी दिल्ली | मी कुठं जात नाही, भाषण देत नाही. कारण माझ्या भाषणामुळे काँग्रेसची मतं कमी होतात, अशी खंत काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालाय. 

काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी यांची भेट घेऊन दिग्विजय सिंग बाहेर पडले, त्यानंतर तिथं जमलेल्या कार्यकर्त्यांना ते उपदेश देत होते. 

नुसती स्वप्नं पाहू नका त्याने तुमचं सरकार येणार नाही. पक्षाचं काम करा. शत्रूला तिकीट मिळालं तरी त्याचा प्रचार करा, असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं. 

दरम्यान, एकेकाळी काँग्रेसची रणनीती ठरवण्यात आघाडीवर असलेल्या नेत्यानं आपल्यामुळे काँग्रेसची मतं घटतात, असं वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय?; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-आज कंदिल घेऊन आलोय, उद्या मशाली घेऊन येऊ; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

-शरद पवार मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात!

-राज्याच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

-मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल; अमित शहांची घेणार भेट

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या