बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अडवाणी जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली’; ‘या’ काँग्रेस नेत्याची टीका

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले दिग्वीजय सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. लालकृष्ण अडवाणींनी 1990 मध्ये रथयात्रा काढली आणि समाजात फुट पाडली, असा आरोप दिग्वीजय सिंंह यांनी लगावला आहे.

यावेळी दिग्वीजय सिंह यांनी अडवाणींबरोबरच भाजपवरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, भाजप हा देशात द्वेष निर्माण करणारा पक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, 1984 मध्ये भाजपला केवळ 4 जागा मिळाल्या. त्यामुळे अटलबिहारींच्या गांधीवादी समाजवादी पक्षाला यश न मिळाल्याने भाजपने हिंदूत्त्वाचा मार्ग निवडला, असा घणाघात त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, भाजपच्या केवळ 4 जागा निवडून आल्यानंतर भाजपने रामजन्मभूमी बाबरी मशिदीचा मुद्दा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप त्यांनी लगावला आहे. शिवाय लालकृष्ण अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेमुळेच देशात फुट पडली असून भाजप नेहमीच फुट पाडण्याचं काम करत आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

माजी मंत्री सलमान खुर्शीद यांच्या सनराईज ओव्हर अयोध्या: द नेशनहूड इन अवर टाईम या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात दिग्वीजय सिंह बोलत होते. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी रामजन्मभूमी बाबरी मशिद यावर भाष्य केलं आहे. याबद्दल बोलत असतानाच दिग्वीजय सिंह यांनी भाजप आणि अडवाणींवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

“वरिष्ठांनी आता नवाब मलिकांना थांबवावं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”

“…जर हे राजकारण असेल तर ते आम्ही सदैव करणार”

‘त्या’ एसटी कामगारांची नोकरी जाणार?; एसटी महामंडळाकडून कारवाई सुरू

“बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीये”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर लवकरच होणार ‘ही’ शस्त्रक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More