Loading...

“पुलवामासारख्या घटनांचा जेव्हा जाब विचारला तेव्हा गद्दार ठरवलं जातं”

नवी दिल्ली | पुलवामासारख्या घटनांचा सरकारकडे जाब विचारल्यास गद्दार ठरवलं जातं, असं म्हणत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारवर टीका केली आहे.

पुलवामा हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं. जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्वत: हे मान्य केलं आहे, असं सिंह यांनी म्हटलं आहे.

Loading...

पुलवामासारखी घटना दुसऱ्या देशात घडली असती तर पंतप्रधानाचा नव्हे तर कमीत कमी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला असता. मात्र आपल्याकडे याचा साधा जाब जरी विचारला तरी थेट गद्दार ठरवलं जातं, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 14 फेब्रुवारीला जम्मू- काश्मिरमधल्या पुलवामा जिल्ह्यात CRPF च्या जवानांच्या गाडीवर जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

Loading...

ANI या वृत्तसंस्थेकडून करण्यात आलेलं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-कलम 370 हटवणं लोकशाहीविरोधी निर्णय- प्रियांका गांधी

-‘हिंदू पाकिस्तान’ शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाचं अटक वॉरंट

-सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

-पुण्यातील शिक्रापूरमध्ये महिलेचा विनयभंग, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

-लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला- संभाजी भिडे

Loading...