महाराष्ट्राच्या दीक्षा दिंडेचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली | राष्ट्रीय युवा दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्राची कन्या दीक्षा दिंडेला सन्मानित करण्यात आलंय. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये आयोजित 22 व्या राष्ट्रीय युवा संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते दीक्षाचा सन्मान करण्यात आला. वंचित आणि अपंगांना शिक्षण मिळावं यासाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन तिला या सन्मानानं गौरवण्यात आलं. 

दरम्यान, ग्रेटर नोएडाच्या गौतम बुद्ध विद्यापीठात यंदाचं राष्ट्रीय युवा संमेलन पार पडतंय. 12 ते 16 जानेवारी दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचं याठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे.