Top News देश

दिलदार पंत! उत्तराखंडामधील पीडितांना केली मोठी मदत जाहीर

चेन्नई | उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्यानं मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी झाली आहे. घडलेल्या या दुर्घटनेमुळं भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कसोटी सामन्याचं मानधन पीडितांना मदत कार्यासाठी देणार आहे.

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने खूप दु ख झाले. मी चेन्नईत सुरु असलेल्या कसोटी सामन्याचं पूर्ण मानधन मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रिषभ पंतने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे.

या दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढं यावं, असं आवाहनही रिषभ पंतने केलं आहे. रिषभ पंत हा मूळचा उत्तराखंडचा आहे. त्याचे संपूर्ण कुटुंबातील सदस्य उत्तराखंमध्ये राहतात.

दरम्यान, 7 फेबुवारी रोजी सकाळी झालेल्या दुर्घटनेत ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प सगळा उद्धवस्त झाला आहे. शकडो कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असून, त्यातील अनेकांची सुटका करण्यात आली आहे. तसंच आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

‘नशिबानं थट्टा मांडली’; चेतेश्वर पुजारा झाला एक टप्पा आऊट, पाहा व्हिडीओ

‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या