पुणे महाराष्ट्र

माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास तहसिलदारांचे पतीच जबाबदार- दिलीप मोहिते पाटील

पुणे | तहसीलदार आणि त्यांचे पती बाळासाहेब आमले माझ्यावर चिडून आहेत. त्यामुळे माझा घातपात होण्याची दाट शक्यता आहे. माझ्या जीवाला काही धोका झाल्यास, त्यास बाळासाहेब आमले हेच जबाबदार असतील, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारी अर्जात आमदार मोहिते यांनी म्हटलं आहे की, तालुक्यातील तलाठी आणि शासकीय कर्मचारी नागरिकांना सहकार्य करत नसून अवास्तव मागणी करत आहेत, अवैध कामांना तहसीलदारांनी संरक्षण दिलं असून त्यांच्या कामचुकारपणामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

म्हणून पालकमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे त्यांच्या बदलीची मागणी केली, तसेच तालुक्यासाठी कार्यक्षम तहसीलदार देण्यासाठी लेखी आणि तोंडी पाठपुरावाही केला. त्यामुळे तहसीलदार आणि त्यांचे पती बाळासाहेब आमले माझ्यावर चिडून आहेत. ते विरोधकांना हाताशी धरुन माझी बदनामी करत आहेत, असंही मोहिते पाटील  यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केल्याची माहिती आहे.

आमदार मोहितेंच्या आरोपांचं तहसीलदार सुचित्रा आमले यांनी मात्र खंडन केलं आहे. माझी बदली होत नाही, त्यामुळे आमदारांनी अशी तक्रार दाखल केली आहे. माझ्या कुटुंबांचा या तक्रारीशी काडीमात्र संबंध नाही. मी गैरव्यवहार केला असेल तर माझे वरिष्ठ माझी चौकशी करतील, असं त्यांनी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

पार्थ पवारांच्या राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; “संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सहनूरने 30 हजार सॅनिटरी पॅडचं केलं वाटप

टिकटॉक खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट नाहीतर ‘ही’ मोठी कंपनी तयार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या