नाशिक महाराष्ट्र

आमदार दिलीप बनकरांच्या पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश!

नाशिक | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते. आता या विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत.

थेट विभागीय आयुक्तांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचे पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या-

पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती

“मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण”

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या