नाशिक महाराष्ट्र

आमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

नाशिक | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली करण्यात आली. या लग्नात सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, ज्यांनी कायद्याचे पालन करायचं असतं तेच जर अशा प्रकारे उपस्थित राहून कायद्याची पायमल्ली करत असल्यास सामान्य माणसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचा आदर्श ठेवायचा, असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केलाय.

थोडक्यात बातम्या-

हाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या