बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

कोलकाता | बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूकीचे वारे वाहू लागलेत. येणाऱ्या पुढील वर्षात ही निवडणूक होणार असून राजकीय पक्षांनी मात्र तयारीला सुरुवात केलीये. याचवेळी एका भाजप नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झालीये.

निवडणूकीच्या दृष्टीने भाजपने पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलंय. यादरम्यान भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एका सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचीच धमकी दिलीये.

घोष म्हणाले, “मी ममता दीदींच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, जे वाईट गोष्टी करत आहेत, त्यांनी 6 महिन्यात स्वतःमध्ये बदल करावेत. अन्यना त्यांचे हात, पाय तुटतील आणि डोकंही फुटेल.”

“त्या त्या कार्यकर्त्यांना घरी जाण्याअगोदर रुग्णालयात जावं लागेल. जर कार्यकर्त्यांना जास्त त्रास दिला, तर त्यांना थेट स्मशानभूमीत पाठवलं जाईल,” अशी धमकी घोष यांनी दिलीये.

महत्वाच्या बातम्या-

पुढील आयपीएल भारतात की बाहेर?; गांगुलींनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करू- लता मंगेशकर

ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

“नोटाबंदी चूक नव्हे, मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल”

अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ता गायकवाडला इशारा, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More