मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी वेब सीरिजमधील बोल्ड आणि अर्वाच्च भाषेतील संवादावर संताप व्यक्त केला आहे. सौरभ पंत यांच्या युट्यूब पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.
प्रत्येक गोष्टीची एक सीमा, मर्यादा असते. त्यामुळे त्या चौकटीत राहून काम केलं तरच ते काम करण्याची मज्जा आहे. पण, जर तुम्ही ती चौकट मोडून काम करत असला तर पुढे त्यावरुन तुम्हालाच संकटांचा सामना करावा लागेल, असं दिलीप जोशी म्हणाले.
ओटीटीवर अनेकदा चांगले विषय हाताळले जातात, उत्तम कलाकारही असतात. मात्र, बऱ्याच वेळा या सीरिजमध्ये शिवीगाळ किंवा अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात येतो हे चुकीचं आहे, असं दिलीप जोशी यांनी म्हटलंय.
तुम्ही नेमकं काय दाखवता यावर सगळं आधारित आहे. कारण आपण जे सादर करतो ते कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलं जातं. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने अपशब्दांचा वापर करावा अशी तुमची इच्छा आहे का?, असा सवाल दिलीप जोशी यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा- उद्धव ठाकरे
“बाहेर येताच अर्णब 100 टक्के भाजपचा विरोध करणार”
“अनेकजण आमदारकीसाठी इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही”
“बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु
राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील