कोणी कितीही मोठा असला तरी यंदा कोरेगावमध्ये सभा घेण्यास परवानगी नाही!

अहमदनगर | कोणी कितीही मोठा असला तरी यंदा कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ सभा घेण्यास परवानगी दिली जाणार नाही, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार घडला होता. यामुळे या वर्षी १ जानेवारीला सरकार मोठी काळजी घेणार आहे. 

ज्यांना सभा घ्यायची असेल त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करुन दिली जाईल. मात्र विजय स्तंभाच्या जवळ कुणालाही सभेला परवानगी दिली जाणार नाही, असं कांबळेंनी म्हटलंय.

दरम्यान, सरकारने परवानगी दिली नाही तरी कोरेगावमध्येच सभा घेणार असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांनी दिलाय. 

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे  

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली