पिंपरी-चिंचवड | मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा बारावीनंतरचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ही घोषणा केली आहे. निगडीत आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल. त्यांच्या देशातील तसेच परदेशातील शिक्षणाचा खर्च सामाजिक न्याय विभाग करेल, असं दिलीप कांबळे म्हणाले.
दरम्यान, अण्णाभाऊ साठे प्रबोधनपर्व समितीच्या वतीने सोपान हरिभाऊ खुडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिलीप कांबळे यांनी त्यांचा सन्मान केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल
-मुख्यमंत्री समर्थक आमदार रवी राणा यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
-ऊसबिलाची रक्कम थकल्यानं सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याची आत्महत्या
-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक
-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?