मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण?

मुंबई| प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची नाजूक प्रकृती बघता त्यांना, खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये, म्हणून संबंधित व्यक्तिला क्वारंटाईन वा आयसोलेशनमध्ये ठवलं जातं. म्हणजेच, हवेशीर बंद खोलीत वेगळं ठेवलं जातं. दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण झालेली नाही. याचसंदर्भात दिलीप कुमार यांनी एक ट्वीट केलं आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत. असं ट्विट प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनी केलं आहे. त्यांच हे ट्विट पाहून त्यांचे सर्व चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे..

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी जाणं जितकं टाळता येईल तितकं टाळा. आरोग्य विभागाच्या सूचना पाळण्याचं देखील आवाहन दिलीप कुमार यांनी केलं आहे.

देशात आतापर्यंत 125 जणांना करोनाची लागण झाली आहे, तर तीघांचा या रोगाने बळी गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या सर्वीधिक असून मुंबईमध्ये आज कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

बाबासाहेब बघताय ना… गोगोईंच्या राज्यसभा नियुक्तीवर आव्हाडांचा निशाणा

पहिल्यांचा शपथ घेऊ द्या मग सांगतो मी का राज्यसभेवर जातोय…- रंजन गोगोई

रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी म्हणजे मोदींनी पर्रिकरांचा केलेला अनादर- काँग्रेस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या