बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलीप कुमार यांची पुन्हा प्रकृती खालावली; मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात केलं दाखल

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते आयसीयुमध्ये असल्याचं सांगितलं जातं आहे. काल त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील नाॅन कोविड रूग्णालय असलेल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांना 6 जूनला भरती करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 10 दिवसांपूर्वीचं रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं होतं.

दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली होती. एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांच्या दोन्ही भावांचं नुकतंचं निधन झालं आहे.

दरम्यान, दिलीप कुमार यांचा एकेकाळी बाॅलिवूडमध्ये दरारा होता. 1944 मध्ये त्यांनी बाॅलिवुडमध्ये पाऊस प्रदार्पण केलं होतं. इतक्या वर्षानंतर देखील त्यांचे आताही अनेक फँन्स आहेत. दिलीप कुमार यांच्या तब्येतीबद्दल अभिनेत्री आणि पत्नी सायरा बानो सतत चाहत्यांना अपडेट देत असतात आणि चाहतेसुद्धा त्यांच्या आरोग्यसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैचा दुसरा आठवडा महत्त्वाचा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितली निकालाची तारीख!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली ‘ही’ आठवण

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ‘भारत बायोटेक’ला मोठा फटका; इतक्या कोटी डॉलर्सचा करार स्थगित

“शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही मानत असाल तर…”

तासाभरात होत्याचं नव्हतं झालं; रिमोटची बॅटरी गिळल्याने अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More