बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”

पुणे | शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेची निवडणुक हरले आहेत. या पुढे त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार नाही म्हणून ते नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांना भाजपमध्ये जाण्याासाठी निमित्त पाहिजे म्हणून ते खेड पंचायत समीतीच्या इमारतीचा विषय घेऊन ते नौटंकी करत असून ते जाणीवपुर्वक गरळ ओकत असल्याची टीका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठींबा देत आहोत आणि हे इथं आम्हाला विरोध करत असल्याचं दिलीप मोहिते पाटील म्हणाले. खेड पंचायत समिती इमारतीबाबत पत्रकार परिषद घेत आढळराव पाटलांनी दिलीप मोहितेंवर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिलीप मोहिते पाटील बोलत होतेे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे अजुनही त्यांचा पराभव पचवू शकले नाहीत. त्यात पुढील निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचा उमेदवार हा राष्ट्रवादीचा असल्याने ते भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. त्यामुळेच ते राजीनाम्याची आणि आंदोलनाची भाषा करत असल्याचं दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आढळरावांना खेड पंचायत समितीत त्यांच्याच पक्षाचे लोक विचारत नाहीत. पंचायत समितीचा सभापती, उपसभापती त्यांच्या मताप्रमाणे होत नाही आणि ते कसला इमारतीचा विषय घेऊन बसलेत. सध्याचे सभापती भगवान पोखरकर यांना आघाडी धर्म पाळून आम्ही मदत केली तेव्हा ते सभापती झाले. त्यावेळी ते आमच्या पाया पडायला आले होते. आज त्यांनी आमच्यावर टीका करणं, योग्य नाही, असंही आमदार मोहिते म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट

ही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस

झोमॅटो प्रकरणात खऱ्या-खोटाचा ‘हा’ व्हीडिओ आता होतोय प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘तो डिलिव्हरी बॉय दोषी आहे, असं मला वाटत नाही’; झोमॅटोच्या कामराजला परिणीतीचा मदतीचा हात!

“मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More