दिलीप वळसे पाटिलांनी राष्ट्रीय राजकारणात जावं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे | राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आता राष्ट्रीय राजकारणात जावं यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुक लढवावी, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळं दिलीप वळसे पाटील यांचा आज सत्कार करण्यात आला, सत्कार सुरु असतानाच मुख्यमंत्र्यानी हा सल्ला दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

मागील लोकसभा निवडणूक दिलीप वळसे पाटील यांनी शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा होती, पण त्यांनी लाोकसभेत जाण्यास नकार दिला होता.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार दहा दिवसांत जाहीर करु, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होत.

महत्वाच्या बातम्या –

-“रामाचं मंदिर रामाच्या जन्मस्थानी नाही होणार, मग कुढल्या स्थानी होणार?”

-नितेश राणे-रामदास कदम वाद चिघळला; नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

-अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल

-“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

-68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक; फेसबुकनं मागितली माफी