बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांनी एका वर्षांत समीर वानखेडेंची नोकरी घालवणार. त्यांची तुरुंगात रवानगी करणार, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारकडून समीर वानखेडेंच्या चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्न उदभवत नाही. ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय.

त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मी खुलं आव्हान देतो की, एका वर्षाच्या आत समीर वानखेडे यांची नोकरी घालवणार, समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित आहे. तुम्ही केलेला खोटारडेपणा जनतेच्या समोर आणणार, समीर वानखेडे यांचे वडील आणि त्यांच्या घरातील सर्व लोक बोगस आहेत, असं नवाब मलिक म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More