एक धक्का और दो… यह सरकार गिरा दो- वळसे-पाटील

मुंबई | आजच्या किसान मोर्चाच्या निमित्ताने सर्वांनी एकच निश्चय करायला हवा,  “एक धक्का और दो…यह सरकार गिरा दो!”, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिलीय.

फक्त गेल्या सहा महिन्यांचा महाराष्ट्र डोळ्यापुढे आणा. असा एकही समाजघटक शिल्लक राहिलेला नाही, ज्याने या सहा महिन्यात सत्ताधा-यांच्या विरोधात मोर्चा काढलेला नाही किंवा आंदोलन केलेले नाही, असं वळसे-पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.

लबाड भाजप सरकारने प्रत्येकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे, असंही वळसे पाटील म्हणाले आहेत. किसान लाँग मार्चच्या निमित्ताने त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. 

वळसे-पाटलांची फेसबुक पोस्ट-