बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोडांच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

पुणे |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते आणि तत्कालिन मंत्री संजय राठोड यांना क्लीन चीट देण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड यांच्या प्रकरणात पोलिसांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये त्यामुळे क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही. पुणे पोलीस तपास करत आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांंशी बोलत होते.

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसात जबाब दिला आहे. त्यामध्ये पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी जबाबात म्हटलं आहे. तसेच पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार हा राजकीय नाट्य असल्याचंही त्यांनी जबाबात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लीनचिट देण्यात आलेली नसून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे. याबाबत आम्ही पुणे पोलिस आयुक्त तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.

थोडक्यात बातम्या- 

“मोदींनी कौतुक केलं म्हणून योगी सरकारचं अपयश लपत नाही”

“आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण आरएसएची विचारसरणी मध्ये आली”

मोदी सरकारनं दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; खरेदी करणार ‘इतके’ कोटी डोस

‘हो, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत’; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर बलात्काराचा आरोप; तीन वर्ष अत्याचार केल्याचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More