‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?

Baramati

Yugendra Pawar | लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूद्ध अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं होतं.

बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार लढतीत अजित पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

फेरमतमोजणीसाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार

 युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज

निवडणुकीत अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.

युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

11 पराभूत उमेदवारांनी केला अर्ज

शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर! कोणाला लागणार लॉटरी?

“नकोच ते राजकारण”; दिलीप वळसे पाटलांच्या मुलीची पोस्ट चर्चेत

मुंबई व ठाण्यात ‘इतके’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .