बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे आता नवा गृहमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे सरकार ज्यावेळी विराजमान झालं त्यावेळी अजित पवार गृहमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र शरद पवारांनी यावेळी आपल्या मर्जीतील नेत्याकडे गृहमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनिल देशमुख यांच्या गळ्यात गृहमंत्रिपदाची माळ पडली. आता अनिल देशमुख यांना या पदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर शरद पवार आपल्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या दुसऱ्या नेत्याकडे हे पद सोपवणार असल्याची माहिती आहे.

दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्याकडेच हे पद आता शरद पवार देऊ शकतात, अशी माहिती आता समोर आली आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता असून या निर्णयाकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर एक वेळ अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तेव्हा देखील दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात होतं. आता मात्र पुन्हा एकदा त्यांचीच गृहमंत्रिपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरु झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; राबवणार ‘ही’ मोहिम

फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानचा फखर जमान द्विशतकाच्या तोंडावर आऊट, मुंबई इंडियन्ससच्या खेळाडूला शिक्षा

इरा नाही तर ‘हे’ आहे आमिर खानच्या मुलीचं खरं नाव; चुकीचं नाव उच्चारल्यास आता 5 हजारांचा दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More