बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य ठाकरेंच्या भाषणानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज ठाकरेंचं भाषण हे प्रक्षोभक होतं. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेतील भाषणाबाबत कायदेशीर मतं घेऊन कारवाई करणार आहोत, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. राज्यातील जनतेने शांतता राखावी. तसेच कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावं, असं आवाहन देखील गृहमंत्र्यांनी केलं आहे.

कुणी कुणाबाबत बोलावं हे मनसे (MNS) आणि भाजपनं (BJP) वाटून घेतलं आहे. राज्यातील वातावरण गढुळ करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. देशात जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे, असा आरोप वळसे-पाटलांनी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांवरून आणखी एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. 4 तारखेपर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘राज ठाकरे चौरंगी चिरा’, शरद पवारांवरील टीकेनंतर सुरेखा पुणेकर कडाडल्या

मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त, लवकरच शस्त्रक्रिया होणार?

राज ठाकरेंच्या सभेनंतर इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More