नवी दिल्ली | दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी पिझ्झा खात असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून काही लोकांनी शेतकरी आंदोलकांवर टीका केली.
खरे शेतकरी सध्या शेतीच्या कामात मग्न आहेत, मग हे कुठले शेतकरी? पिझ्झा, ड्राय फ्रुट्स, चहा, दुध, अस्सल तूप लावलेली गरमा गरम रोटी, डाळ, स्वादिष्ट भाज्या, तंबूमध्ये आरामदायी बेडस, हे आहे आधुनिक काळातले आंदोलन, यही तो है अच्छे दिन ! , हे आंदोलन आहे की पिकनिक, आंदोलन की पिझ्झा पार्टी अशी टीका अनेक नेटक-यांनी केली होती. या टीकाकारांना अभिनेता दिलजीत दोसांजने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
शेतकरी विष पित होता तेव्हा त्याची चिंता नव्हती. आता तो पिझ्झा खातोय तर त्याची न्यूज होतेय, असं ट्विट दिलजीतने केलं.
दरम्यान, दिलजीत दोसांजचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलंय.
Shaa Baa Shey 👏🏼
Badaa Didh Dukheya Tuadha Hain ? pic.twitter.com/u16Ti96AlN
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 14, 2020
थोडक्यात बातम्या-
…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस
“पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये”
“…तर बाळासाहेब ठाकरेंनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता”
“एकाही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं”
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण