बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेठ तुम्ही नादच केलाय थेट! दिनेश कार्तिकने धोनीला मागे टाकत केलाय हा भीम पराक्रम

मुंबई | मुंबई इंडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात कोलकाताने धमाकेदार विजय मिळवला आहे. या सामन्यात कोलकाताच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईचा पराभव आहे. कोलकाताने हा सामना एकहाती जिंकला. या सामन्यामध्ये कीपर दिनेश कर्तिकने फलंदाजी नाही केली तरी मोठा भीम पराक्रम केला आहे.

दिनेश कार्तिकने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे. आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक झेल पकडले आहेत. मुंबईचा फलंदाज सूर्यकुमारला बाद करत झेलसह कार्तिकने आयपीएलमधील 115 झेल घेतले आहेत.

याआधी धोनी 114 झेलसह पहिल्या स्थानावर होता. मात्र आता कार्तिकने पहिलं स्थान गाठलं आहे. धोनी आणि कार्तिकशिवाय एकाही यष्टीरक्षकाला 100 पेक्षा जास्त झेल घेता आले नाहीत.

दरम्यान, कार्तिक आणि धोनीनंतर नमन ओझा 65 झेल आणि पार्थिव पटेल 65 झेल संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर वृद्धिमान साहा 59 झेलांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

थोडक्यात बातम्या- 

स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं, तुमचं लक्ष कुठे असतं?- अमृता फडणवीस

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More