Dinesh karthik l राजस्थान रॉयल्स बंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. काल राजस्थान रॉयल विरुद्ध तो आयपीएलमधील शेवटचा सामना खेळाला आहे. त्यानी त्याच्या कारकिर्दीत अनेकवेळा यशाला गवसणी घातली आहे.
दिनेश कार्तिकचा आयपीएल 2024 पर्यंतचा प्रवास :
सुरुवातीच्या मोसमापासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचा समावेश होतो. कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने 257 सामन्यात 22 अर्धशतकांसह 4842 धावा केल्या आहेत. कार्तिक आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या 10 खेळाडूंमध्ये सामील आहे. या कालावधीत कार्तिकने 147 झेल आणि 37 स्टंपिंगही घेतले. तसेच आयपीएल 2024 च्या 15 सामन्यांमध्ये 326 धावा केल्या आहेत.
दिनेश कार्तिकने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) मधून त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली. 2010 पर्यंत दिल्ली कॅपिटल्समध्ये राहिल्यानंतर, तो पंजाब किंग्ज (2011), मुंबई इंडियन्स (2012-13), 2014 मध्ये पुन्हा दिल्ली, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2015), गुजरात लायन्स (2016-17) व कोलकाता नाइट रायडर्स (2018-21) कडून खेळला आणि त्यानंतर 2022 मध्ये तो पुन्हा आरसीबीमध्ये सामील झाला.
From #RCB to Dinesh Karthik ❤️ #TATAIPL | #RRvRCB | #TheFinalCall | #Eliminator | @RCBTweets | @DineshKarthik pic.twitter.com/p2XI7A1Ta6
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Dinesh karthik l दीपिकाच्या एन्ट्रीनं कार्तिकचं आयुष्य बदललं :
दिनेश कार्तिकचे क्रिकेट करिअर अनेक चढ-उतारांचे राहिले आहे. दिनेश कार्तिक एकदा प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. कारण 2007 मध्ये 21 वर्षीय दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारासोबत लग्न केले.
लग्नाच्या 5 वर्षानंतर निकिताने स्वारस्य गमावण्यास सुरुवात केली आणि तामिळनाडूमध्ये कार्तिकचा सहकारी असलेल्या मुरली विजयच्या प्रेमात पडली. 2012 मध्ये दिनेश कार्तिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यावेळी तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होऊ लागला. याच कारणामुळे तो टीम इंडियातून बाहेर पडला.
कार्तिक अशा अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर त्याचा मित्र अभिषेक नायरने त्याला नैराश्यातून बाहेर काढले आणि त्यानंतर भारतीय स्क्वॉश चॅम्पियन दीपिका पल्लीकलची आणि कार्तिकची भेट झाली आणि तिने दिनेश कार्तिकला पुन्हा मैदानात उतरवले. मात्र या काळात कार्तिक आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नही केले आणि पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले.
News update – Dinesh karthik Personal Life
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख खानवर अजूनही उपचार सुरू?; हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर
बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहुल; केलं मोठं वक्तव्य
बापरे! साड्यांच्या किंमती वाढल्या; मोजावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे
आरसीबीने दिनेश कार्तिकला दिला खास निरोप; भावुक व्हिडिओ व्हायरल