Dinesh Karthik l आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग 6 विजयांसह प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या बेंगळुरूला राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात हरवून स्पर्धेतून बाहेर काढले आहे. त्यामुळे बेंगळुरूचा आयपीएल पर्वातील प्रवासही संपला आहे.
RCB च्या चाहत्यांना बसला दुहेरी धक्का :
मात्र हा पराभव बेंगळुरूच्या चाहत्यांसाठी दुहेरी धक्का होता. कारण बेंगळुरू संघासोबतच दिनेश कार्तिक या दिग्गज खेळाडूची कारकीर्द देखील इथेच संपली आहे. अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने आधीच आयपीएल 2024 हा त्याचा शेवटचा हंगाम घोषित केला होता आणि हा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा ठरला आहे.
अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्सच्या रोव्हमन पॉवेलने 19व्या षटकातील शेवटचा चेंडू खेळताच सर्वांच्या नजरा दिनेश कार्तिककडे लागल्या होत्या. कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीतील हा शेवटचा चेंडू होता. सर्व खेळाडूंनी हात हलवून एकमेकांना मिठी मारायला सुरुवात केली आणि मग ही औपचारिकता पूर्ण झाल्यावर विराट कोहलीसह आरसीबीच्या खेळाडूंनी कार्तिकला एका खास पद्धतीने निरोप दिला आहे.
From #RCB to Dinesh Karthik ❤️ #TATAIPL | #RRvRCB | #TheFinalCall | #Eliminator | @RCBTweets | @DineshKarthik pic.twitter.com/p2XI7A1Ta6
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Dinesh Karthik l स्टेडियममध्ये ‘डीके-डीके’चा आवाज घुमला :
स्टेडिअमवर उपस्थित असलेले चाहते दिनेश कार्तिकला निरोप देताना उभे राहिले आणि टाळ्या वाजवत ‘डीके-डीके’ म्हणत होते, तर आरसीबीचे सर्व खेळाडूही या आयपीएल दिग्गजासाठी टाळ्या वाजवत राहिले आणि या शानदार कारकिर्दीसाठी त्याचा आदर करत राहिले. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक व्हिडीओ बनवून दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीला सलाम केला आहे.
कार्तिकचा हा शेवटचा सीझन खूप छान होता. त्याने यावर्षी 15 सामन्यात 187.36 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 326 धावा केल्या, ज्यात 27 चौकार आणि 22 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या अनेक खेळींनी आरसीबीला प्लेऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्तिकने एकूण 17 हंगामात 257 सामने खेळले आणि 4842 धावा केल्या, ज्यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 145 झेल आणि 37 स्टंपिंगही केले. या काळात त्याने मुंबई इंडियन्ससोबत आयपीएलचे विजेतेपदही पटकावले.
News Title – Dinesh karthik retirement ipl 2024
महत्त्वाच्या बातम्या
काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला! ‘या’ आमदाराचे निधन
पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं वळण; कोर्टाने दिला मोठा निर्णय
या राशीच्या व्यक्तींनी वादाचे प्रसंग टाळावेत अन्यथा होईल मोठं नुकसान
“पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष”
मोठी बातमी! शाहरूख खानची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल