Top News खेळ

धोनीला मागे टाकत दिनेश कार्तिकची नव्या विक्रमाला गवसणी

दुबई | कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात कोलकात्याने सहज विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास संपलाय.

कालच्या सामन्यात कोलकात्याच्या दिनेश कार्तिकला फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र यष्टीरक्षक म्हणून त्याने राजस्थान विरूद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातलीये.

काल राहुल तेवातियाचा कॅच कार्तिकने पडकला. आयपीएलच्या कारकिर्दीत यष्टीरक्षक म्हणून हा त्याच्या 110 वा कॅच ठरलाय. महेंद्रसिंग धोनीने किपिंग करताना सर्वाधिक 109 कॅच घेतले होते. हा विक्रम मोडत दिनेश कार्तिकने इतिहास रचला.

कोलकात्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या अर्धशतक जोरावर महत्वाच्या सामन्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. मात्र या आव्हानाचा पाठलाग करणं राजस्थानला कठीण झालं आणि अवघ्या 20 ओव्हरमध्ये 131 रन्स करणं शक्य झालं.

महत्त्वाच्या बातम्या-

“काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात”

एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात; स्वतः ट्विट करून दिली माहिती

“….आणि साहेबांना घरी बसल्या दिल्लीची स्वप्न पडतायत”

“सिंधुदुर्गधील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या