Dinesh Kartik - चॅम्पियन्स ट्रॉफीतून मनिष पांडेची माघार, दिनेश कार्तिकची निवड
- खेळ

चॅम्पियन्स ट्रॉफीतून मनिष पांडेची माघार, दिनेश कार्तिकची निवड

मुंबई | दुखापतग्रस्त झाल्याने मनिष पांडेने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मनिष पांडेच्या जागी दिनेश कार्तिकची संघात वर्णी लागली आहे. आयपीएल, विजय हजारे करंडक आणि रणजी करंडकात दाखवलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कार्तिकला ही संधी मिळाली आहे.

विजय हजारे करंडकात ६०४ धावा, रणजी करंडकात ७०४ धावा, तर आयपीएलमध्ये ३६१ धावा दिनेश कार्तिकने केल्या आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा