Top News नाशिक मनोरंजन महाराष्ट्र

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

धुळे | राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा हवाला देत सरकारनं तब्बल 59 चीनी अ‌ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. लोकप्रिय अॅप टिकटाॅकचाही यामध्ये समावेश आहे. सरकारच्या या निर्णयानं सर्व भारतीयांचा उर अभिमानाने दाटून आला असावा. मात्र टिकटाॅकवरून प्रसिद्धीचं वलय प्राप्त झालेल्या धुळ्याच्या दिनेश पवारला फार मोठा धक्का बसला  आहे.

जुन्या गाण्यांवर आपल्या दोन बायकांसबोत दिनेशचे व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाले. एवढंच काय टिव्ही चॅनल्स व वृत्तपत्रांनींही या कलाकारी जोडप्यांचं भरभरून कौतुक केलं. मात्र आता आम्ही उध्वस्त झालोय. माझ्या बायका हे ऐकून ढसाढसा रडल्या असं दिनेशने सांगितलं आहे.

टिकटाॅकवर सुपरहिट झाल्यापासून या अवलिया जोडप्यानं तब्बल 30 लाखांची कमाई जमवली होती. आता टिकटाॅक बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं या कलाकारी कुटुंबाला पुन्हा काबाडकष्ट करून आयुष्य घालवण्याची वेळ आली आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री या आदिवासी भागात राहणारं हे जोडपं टिकटाॅकमुळे सर्वांच्या परिचयाचं झालं. पहिली पत्नी असताना दिनेशचं अजून एका महिलेवर प्रेम जडलं. पहिल्या पत्नीनंही दिनेशला तिच्याशी लग्न करण्यास मज्जाव केला नाही. सध्या तिघेही एकत्र राहत असून टिकटाॅक स्टार म्हणून त्यांना देशभरात आगळीवेगळी ओळख मिळाली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

“सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते”

मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत- अक्षय कुमार

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ- आशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या