बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात जमावबंदी लागू करण्याचा विचार- डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे | पुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मोठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा विचार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलंय.

पुण्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 15 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात पाच नवीन रुग्ण ऍडमिट करण्यात आले आहेत. काल पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही प्रकारचं नियोजन करत आहोत. काही भागात 144 कलम लावण्याचा विचार करत आहोत. त्याचबरोबर अनावश्यक गर्दी टाळण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे, असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सरकारनं मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण, मॉल्समधील ड्रग्ज, भाजीपाला आणि ग्रॉसरी हे सुरू राहतील. याशिवाय कुठलंही दुकान सुरू ठेवलं जाणार नाही, असं म्हैसकर यांनी सांगितलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

Coronavirus | आईची काळजी मिटावी म्हणून पिंपरीत शिकणारा मुलगा घरी परतला

… म्हणून महाजन, आशिष शेलारांकडे पाहत जयंत पाटील म्हणाले….फडणवीस साहेब यांना तिकडे बसवा!

महत्वाच्या बातम्या-

मध्य प्रदेशनंतर आता गुजरात काँग्रेसला झटका; काँग्रेसचे 7 आमदार बेपत्ता

फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More