जो पर्यंत शरद पवार आहेत, तो पर्यंत माझं कोणीही *** वाकडं करू शकत नाही!

सोलापूर | सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिप मध्ये त्यांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला आहे.

शरद पवार आहेत तो पर्यत माझं जिल्ह्यातूनच काय तर राज्यातूनही कोणी *** वाकडं करू शकत नाही, तसंच मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सबकी एक ही पुकार, जन की हो सरकार; हार्दिक पटेलचा मध्य प्रदेशमध्ये एल्गार

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात नाकारला पुष्पगुच्छ

-दांडिया खेळायला आला नाही म्हणून प्रेयसीनं प्रियकराला भररस्त्यात चोपलं!

-“अयोध्या वारीसाठी शिवसेनेला शुभेच्छा, पण…”; शिवसेना भवनाबाहेर मनसेची पोस्टरबाजी

-अमृतसर रेल्वे दुर्घटनेवरुन राजकारण; काँग्रेसवर आरोप करणारा भाजपचा प्रवक्ता