बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल

मुंबई | डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्याला नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. आता दीपाली चव्हाण यांनी नवरा आणि आईसाठी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं भावनिक पत्र आता समोर आलं आहे.

दिपीली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या पतीला लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…

प्रिय नवरोबा…

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे.

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेलेय. खरंच भरून गेलेय. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात.

मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस, माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्रास, त्यांच त्रास देनं कमी झालं नाही..

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं.. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे.. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर.. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे.. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे..

आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू.. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे.. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार डीसीएफ शिवकुमार हा आहे..

दिपाली…

थोडक्यात बातम्या- 

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

फोन टॅपिंगप्रकरणी एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले…

स्वबळावरच लढणार!; नाना पटोलेंच्या नव्या भूमिकेनं महाविकास आघाडीला मोठा धक्का

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More